CiViLSENSE Social Foundation · GoBiz TechWorks LLP चा सामाजिक उपक्रम
समाजासाठी अभियांत्रिकी
अभियांत्रिकीचे ज्ञान फक्त कार्यालये आणि फायलींपुरते राहू नये. या उपक्रमातून अभियंते आपले ज्ञान विद्यार्थी आणि समाजापर्यंत पोहोचवतात — सुरुवात पाण्यापासून.

तुमच्या घरात रोज किती पाणी वापरले जाते, माहीत आहे?
पाणी सगळेच वापरतात, पण त्याचा हिशेब फार थोडे ठेवतात. घर, शाळा, गाव — छोट्या सवयींचा एकत्रित परिणाम किती मोठा असतो, हे अभियंते रोज पाहतात. हीच जाण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा आमचा प्रयत्न.
शाळांमध्ये पाणी जनजागृती
पुणे आणि परिसरातील गावांमधील इयत्ता 7 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक सत्रे — पाणीबचत आणि water footprint (जलपदचिन्ह) म्हणजे अन्न, कपडे आणि रोजच्या वस्तूंमागे दडलेले पाणी.
सत्राची पद्धत: मराठीतून, सोप्या भाषेत, प्रत्यक्ष उदाहरणे आणि छोट्या कृतींसह.
शाळांमधील सत्रे विनामूल्य आहेत.
तुमच्या शाळेत सत्र आयोजित कराविद्यार्थी काय शिकतात
- एका कुटुंबाला प्रत्यक्षात किती पाणी लागते
- रोजच्या वस्तूंमागे दडलेले पाणी
- घर आणि शाळेसाठी पाणीबचतीच्या सोप्या सवयी
कार्यक्षेत्रे
- सुरू
पाणी जनजागृती
विद्यार्थी आणि समाजासाठी पाणीबचत व water footprint.
- लवकरच
अभियांत्रिकी जनजागृती
अभियंते काय करतात आणि त्या क्षेत्रात कसे पोहोचायचे, हे विद्यार्थ्यांना समजावणे.
- लवकरच
समाजहितासाठी AI
सार्वजनिक आणि सामाजिक गरजांसाठी सोपे तंत्रज्ञान.
सहभागी व्हा
तुम्ही अभियंता, शिक्षक आहात किंवा पाण्याविषयी आस्था असलेल्या संस्थेत काम करता? स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आमच्यासोबत सहकार्य करा.